‘आरक्षण’ सिनेमा रिलीजआधीच नेत्यांना दाखवा – आर. आर. पाटील

July 29, 2011 10:02 AM0 commentsViews: 2

29 जुलै

रिलीजपूर्वीचं आरक्षण सिनेमाला काही नेत्यांकडून होणारा वाढता विरोध बघता गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या प्रकरणात मध्यस्थी करण्याची भूमिका घेतली आहे. रिलीज होण्यापूर्वी हा सिनेमा विधानसभा सदस्य आणि याला आक्षेप घेणार्‍या नेत्यांना दाखवावा अशी सूचना निर्मात्यांना करणार आहोत अशी माहिती आर.आर. पाटील यांनी दिली.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवू नये, यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी विधानसभेत सांगितलं. रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी अगोदरचं या चित्रपटाला विरोधाची भूमिका जाहीर केली आहे.

close