फाशीच्या शिक्षेविरोधात कसाबची सुप्रीम कोर्टात धाव

July 29, 2011 10:40 AM0 commentsViews: 2

29 जुलै

26/11 च्या मुंबई हल्ल्याचा आरोपी अजमल कसाब याने त्याला सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या मुंबईवर अतिरेकी हल्ल्यात जिंवत पकडलेल्या अतिरेकी अजमल कसाबला या हल्ल्यात दोषी ठरवत 21 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठरवण्यात आली. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि रंजना देसाई यांनी हा महत्त्व पूर्ण निर्णय दिला होता. या शिक्षेविरोधात आज कसाबने आता सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे.

close