स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी पोलिसांनी काढली रॅली

July 29, 2011 11:47 AM0 commentsViews: 130

29 जुलै

स्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आता पोलीसही पुढे सरसावले आहेत. परळीत पोलिसांनीच स्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी रॅली काढली होती. शहरातील पोलीस कर्मचारी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीही यामध्ये सहभागी झाले होते. फलक घेऊन या सगळ्या कर्मचार्‍यांनी शहरभर रॅली काढली.

परळीमध्ये जून महिन्यात 9 अर्भकं एका नाल्यात सापडली होती. त्यानंतर परळीतल्या स्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी या भोगातले पोलीस प्रयत्नशील आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ही रॅली काढण्यात आली.पोलीस उपाध्यक्षा स्वाती भोर यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. दरम्यान बीडमध्ये 20 सोनोग्राफी सेंटर बंद करण्याच्या दृष्टीने कारवाई सुरु झाली. 11 रेडिओलॉजिस्टनी 20 हॉस्पिटल्सची सोनोग्राफी कन्सल्टन्सी मागे घेतली.

close