अण्णांच्या उपोषणाला मेधा पाटकर यांचा पाठिंबा

July 29, 2011 12:11 PM0 commentsViews: 4

29 जुलै

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनीही पाठिंबा दिला आहे. अण्णा हजारेच्या आंदोलनाला आमचा पूर्वी ही पाठिंबा होता आणि आजही आहे. फक्त प्रत्यक्ष उपोषणात सहभागी होण्याऐवजी आम्ही जिथे असू तिथून पाठिंबा देऊ असं मेधा पाटकर यांनी आज औरंगाबाद इथं सांगितलं. भ्रष्टाचार निर्मूलन आणि जमीन अधिग्रहण कायद्यासंदर्भातल्या जनजागरण मोहिमेसाठी मेधा पाटकर औरंगाबाद इथं आल्या होत्या.

close