कलमाडींना 5 वर्षाची उपस्थिती दाखवण्याचा कोर्टाचा आदेश

July 29, 2011 12:22 PM0 commentsViews: 2

29 जुलै

दिल्ली उच्च न्यायालयाने खासदार सुरेश कलमाडींना गेल्या 5 वर्षात किती वेळा संसदेत अधिवेशनाला उपस्थित होतात याची माहिती देणारं ऍफिडेविट सादर करायला सांगितलं आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या सुरेश कलमाडी यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहता यावे असा अर्ज दाखल केला होता.

त्यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत त्यांची गेल्या 5 वर्षांची उपस्थितीबाबत ऍफिडेविट सादर करायला सांगितलं. तसेच सभागृहातील कामकाज टीव्हीवर थेट पाहणे शक्य असताना त्यांना सभागृहात उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे का असा सवालही कोर्टाने विचारला आहे. या अर्जावरची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

close