‘ग्लोबल टायगर डे’ च्यानिमित्ताने वाघ वाचवाची डरकाळी

July 29, 2011 12:30 PM0 commentsViews: 153

29 जुलै

आज जगभरात ग्लोबल टायगर डे साजरा केला जात आहे. भारताततही हा दिवस साजरा होतोय. जगभरात केवळ 3, 500 च्या आसपासच पट्टेदार वाघ शिल्लक असल्याचं लक्षात आलं आणि सगळीकडे खळबळ उडाली होती. त्यानंतर मागील वर्षी जागतिक बँकेने ग्लोबल टायगर या जागतिक मोहिमेला सुरुवात केली.

अन्नसाखळीतला हा सगळ्याच महत्त्वाचा घटक झपाट्याने कमी होत असल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी आता हालचाली होत आहे. वाघ संवर्धनासाठीच्या या जागतिक मोहिमेत आतापर्यंत जवळपास 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स जमा झाले आहेत.

साडेतीनशे डॉलर्सच प्राथमिक लक्ष आहे. वाघांचे अस्तित्त्व असलेले 12 देश यासाठी झटत आहे. भारताचाही पुढाकार आहे. देशातल्या 1, 706, महाराष्ट्रातल्या 169 वाघांसाठी मोठे प्रयत्न होत आहे. राज्यभराता पेंच, ताडोबा, मेळघाट तसेच सह्याद्री डोंगररांगातील काही संरक्षक भागात वाघांचं अस्तित्त्व आहे.

close