‘आयपीएल’कडून 5 कोटी येणं बाकी !

July 29, 2011 12:52 PM0 commentsViews: 5

29 जुलै

आयपीएल आयोजकांनी अजून 5 कोटी रुपयाची थकबाकी दिली नाही अशी माहिती आर.आर. पाटील यांनी आज विधानसभेत दिली. आयपीएल आयोजकांनी 5 कोटी 16 लाख रुपयांचा भरणा केला नाही. मॅचेस दरम्यान पोलीस बंदोबस्त पुरवण्याचा खर्च त्यांनी दिलेला नाही. आयपीएलच्या आयोजकांनी आतापर्यंत 47 लाख 53 हजार रुपयेचं भरल्याचं आर.आर. पाटील यांनी सांगितले.

आयपीएलच्या आयोजकांनी गेल्यावर्षी सात मॅचेससाठी पुरवण्यात आलेल्या सुरक्षेचे पाच कोटी रुपये थकवले आहे. तर यावर्षी सात मॅचेससाठी साडेपाच कोटीच्या जवळपास थकबाकी आहे. एकूण दहा कोटीहुन अधिक थकबाकी पैकी फक्त 45 लाख रुपयांचाच भरणा आयपीएलच्या आयोजकांनी दिले आहे. मागच्या वर्षीची थकबाकी असून देखिल यावेळीच्या सात मॅचेसना सुरक्षा पुरवण्यात आली. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री आर आर पाटील यांनी सुरक्षेचे पैसे न भरणार्‍यांना सुरक्षा न देण्याचे आदेश दिले होते.

close