आयबीएन लोकमत इम्पॅक्ट : गरूड स्तंभाभोवतीचे 4 पिलर पाडण्याचे आदेश

July 29, 2011 1:47 PM0 commentsViews: 1

29 जुलै

आळंदी येथील इंद्रायणी नदीत बांधलेल्या अवैध गरूड स्तंभाभोवती बांधलेले चार पिलर पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी हे आदेश दिले. पिलर उभारताना आक्षेप का घेतला नाही असा जाबही आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारला.

15 दिवसांमध्ये हे बांधकाम पाडण्यात यावे असा आदेशही आयुक्तांनी दिला. आयबीएन लोकमतने याबाबची बातमी दिली होती. आळंदी इथं इंद्रायणीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या भव्य गरुड स्तंभाचे बांधकाम बेकायदेशीर असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली होती.

विशेष म्हणजे 14 मे 2009 मध्ये आपल्या अधिकाराचा वापर करत तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी इंद्रायणी नदीपात्रात हा गरुड स्तंभ उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी दिली होती. नदीपात्रातील हे अनधिकृत बांधकाम पाडण्यास पाटबंधारे विभागाकडून टाळाटाळ होत होती.

close