इंग्लंडची पहिली इनिंग 221 रन्सवर जमा

July 29, 2011 4:39 PM0 commentsViews: 1

29 जुलै

ट्रेंट ब्रिज टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सनी वर्चस्व गाजवलं. भारताच्या भेदक बॉलिंगसमोर इंग्लंडची पहिली इनिंग 221 रन्सवर ऑलआऊट झाली. फास्ट बॉलर्सना साथ देणार्‍या ट्रेंटब्रिजच्या पीचवर भारतील बॉलर्सनं अगदी अचून बॉलिंग केली. एस श्रीसंत, ईशांत शर्मा आणि प्रवीण कुमारने इंग्लंडची इनिंग स्वस्तात गुंडाळली.

ओपनिंगला आलेल्या ऍलिस्टर कुकला आऊट करत ईशांत शर्माने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. तर झहीर खानऐवजी टीममध्ये संधी मिळालेल्या एस श्रीसंतने ट्रॉट, पीटरसन आणि मॅट प्रायर या महत्वाच्या बॅट्समनना पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. तर ईशांत शर्मा आणि प्रवीण कुमारनं त्याला चांगली साथ दिली.

close