अपुर्‍या पोलिसांवर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी

July 29, 2011 3:19 PM0 commentsViews: 1

सुधाकर कांबळे, मुंबई

29 जुलै

मुंबई पोलिसांच्या कामगिरीबाबत सध्या चर्चा सुरू आहे. पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचं पोलीस दल सध्या फक्त 50 टक्के कर्मचार्‍यांवर सुरू आहे. ही धक्कादायक बाब उघड झाली माहितीच्या अधिकारातून.

मुंबई पोलीस दल म्हणजे जगातील दुसर्‍यानंबरचे पोलीस दल. पण सध्या या पोलीस दलाची दुरवस्था झाली. जगातील दुसर्‍या क्रमांकाचे पोलीस दल निम्म्या पोलीस कर्मचार्‍यांवर सुरु आहे. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाने माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीवरुन हे स्पष्ट झालं.

अपुरे पोलीस

- एपीआयची मंजूर पदं आहेत- 605 – पीएसआयची मजूर पदं आहेत- 1735 – पण सध्या मुंबईत पोलीस दलात कार्यरत एपीआय आहेत – 259 – आणि पीएसआय आहेत – 822

या आकडेवारीवरुन 50 टक्के पोलीसच शहराच्या सुरक्षेचा भार उचलत असल्याचं दिसतंय. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाटगे म्हणतात, हे पोलीस अधिकारी गुन्हे दाखल करत असतात. चार्जशिट दाखल करत असतात. पण हे अधिकारी कमी असल्याने आता गुन्हे दाखल करण्याचे पोलीस टाळत असतात.

ही संख्या का याचं कारण मुंबईची लोकसंख्या एक कोटीच्यावर असल्याचं म्हटलं जातं. म्हणजे सहा हजार मुंबईकरांच्या मागे एक पोलीस अधिकारी अशी अवस्था आहे. यावरुनचं सरकार मुंबईच्या सुरक्षिततेबाबत किती गंभीर आहे ते दिसून येतंय.

close