भूसंपादन कायद्याच्या नव्या मसुदा तयार

July 29, 2011 3:47 PM0 commentsViews: 4

29 जुलै

देशभर चर्चेचा विषय बनलेले भूसंपादन कायद्याचे नवे विधेयक तयार झाले आहे. त्याचा अंतिम मसुदा केंद्र सरकारने तयार केला. ते आता महिनाभर सूचना मागवण्यासाठी ठेवलं जाणार आहे. नव्या विधेयकात शहरी आणि ग्रामीण भागातील जमीन संपादनाचे निकष वेगळे असतील.

केवळ सार्वजनिक कामांसाठी सरकार जमीन ताब्यात घेऊ शकतं. त्यासाठी पीडित लोकांच्या सहमतीची गरज नाही. पण इतर कामांसाठी जमीन ताब्यात घेताना संबंधित 80% लोकांची सहमती आवश्यक असणार आहे. ग्रामविकास मंत्रालयाची सूत्रं हाती घेताच जयराम रमेश यांनी या भूसंपादन विधेयकावर लक्ष केंद्रीत केलं.

close