गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी पोलिसांचा असाही प्रयत्न

July 29, 2011 3:23 PM0 commentsViews: 2

29 जुलै

अगदी ब्रिटीशांच्या काळापासून पारधी समाजावर चिकटलेला गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी अहमदनगर पोलिसांनी परिवर्तन मेळावा आयोजित केला होता. दरोड्यासारख्या घटनांमध्ये अनेकदा पारधी समाजाचे युवक गुंतलेले आढळतात. अकोल्यातील दरोड्याची सुईही पारध्यांच्याच पाडावर गेली.

या पार्श्वभूमीवर, अहमदनगर पोलिसांच्या वतीने पारधी तरुणांना शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला. पोलीस हेडक्वार्टरमध्ये झालेल्या या परिवर्तन मेळाव्यात 50 पारधी तरुण-तरुणी सहभागी झाले होते. शारीरिक क्षमता असणार्‍या तरुणांना पोलीस भरतीसाठीचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे.

close