पिंपरी-चिंचवड पालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

July 29, 2011 4:03 PM0 commentsViews: 2

29 जुलै

पुण्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अपक्ष आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारावर तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केलं. महापालिका आयुक्तांना शाषनाने देऊ केलेल्या ज्यादा अधिकाराच्या विरोधात हे आंदोलन केलं. महापालिकाच्या कारभार पारदर्शक असावा यासाठी राज्य शाषनाने महापालिका आयुक्तांच्या अधिकारात वाढ करण्याचा प्रस्ताव केला जारी केला होता.

सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात हा प्रस्तावाच कायद्यात रुपांतर होण्याची शक्यता आहे. आयुक्तांना ज्यादा अधिकार देण्याच्या प्रस्तावाच कायद्यात रुपांतर झाल तर प्रत्येक महानगरपालिकेतील विरोधी पक्षातील नगर सेवकांना त्याचा फटका बसणार आहे.

तसेच सत्ताधारी आणि पालिका आयुक्तंाचा विरोधी नगर सेवकावर दबाव वाढेल असा आरोप आंदोलनकर्त्या नगर सेवकांनी केला. त्यामुळे महापलिकेच कामकाज 74 व्या घटना दुरुस्ती नुसारच चालवावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या वेळी सगळ्या नगर सेवकांनी काळ्या फिती लावून आपला निषेध नोंदविला.

close