नागपुरात अवैध हातभट्‌ट्यांवर कारवाई

July 30, 2011 10:26 AM0 commentsViews: 3

30 जुलै

नागपुरातल्या बुटीबोरी, कोंढाळी, हिंगणा परिसरातील हातभट्‌ट्यांवर धाडी टाकून उध्वस्त करण्यात आल्या आहेेत. जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या भागात हातभट्टीची दारू गाळण्याचे काम सुरू होते. ही माहिती राज्य उत्पादक शुल्क विभाग आणि पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात या पाड्यांवर धाडी घातल्या.

या धाडीदरम्यानचे अत्यंत मोठ्या प्रमाणात इथल्या वस्त्यांमधील आतल्या भागात हातभट्टीची दारू राजरोसपणे काढली जात असल्याचे सर्रास पहायला मिळाले. अनेक ठिकाणी वस्तीतील लोकांनी आणि हा अवैध धंदा करणार्‍यांनी पोलिसांना मज्जाव केला.

याआधीही अनेक ठिकाणी अवैधरित्या दारू काढली जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत असूनही याची फारशी दखल घेतली जात नव्हती. मात्र यावेळी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात धाडी टाकण्यात आल्या आहेत.

close