गिरणी कामगारांच्या प्रमुख मागण्या मान्य !

July 30, 2011 4:07 PM0 commentsViews: 10

30 जुलै

11 वर्षांपासून हक्काच्या घरासाठी लढणार्‍या गिरणी कामगारांना अखेर यश येताना दिसत आहे. आज गिरणी कामगारांसोबत झालेल्या बोलणीनंतर त्यांच्या प्रमुख तीन मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या आहेत.

गिरणी कामगारांना किती घरं आणि कुठल्या किमतीत घरं देता येतील यासाठी एक समिती स्थापन करुन दोन महिन्यात गिरणी कामगारांना घरांच्या किंमती आणि संख्या सांगितली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं.

1 जानेवारी 1982 पासून हजेरी पटावर असणारे सर्व कामगार घरांसाठी पात्र असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुंबईत घरं असणार्‍या कामगारांनाही घरं देण्यात येतील अशी हमीसुद्धा कामगारांना देण्यात आली.

close