जि.प.सदस्यांना मारहाण प्रकरणी अरूण गिरे यांची जामीन

July 30, 2011 11:15 AM0 commentsViews:

30 जुलै

पुणे जिल्हा परिषद स्थायी समितीचे उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे अरुण गिरे यांची पंधरा हजाराच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. शिवसेनेच्या जि.प.सदस्या आशा बुचके यांना स्थायी समितीच्या बैठकीतच अरुण गिरे यांनी मारहाण केली होती. विनयभंग केल्याप्रकरणी त्यांना आज अटक करण्यात आली होती. समर्थनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गिरे यांनीही बुचके यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. शिवाजीनगर कोर्टात त्यांना हजर करण्यात आलं आणि त्यांची सुटका करण्यात आली.

close