मुंबई साखळी बॉम्बस्फोटात मृतांची संख्या 26

July 30, 2011 11:29 AM0 commentsViews: 2

30 जुलै

मुंबईत 13 जुलैला झालेल्या साखळी बॉंबस्फोटामध्ये मृतांची संख्या आता 26 झाली आहे. आज सकाळी हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणार्‍या चंद्रकांत शंकर यांचा मृत्यू झाला.ऑपेरा हाऊस येथे झालेल्या स्फोटात 42 वर्षांचे शंकर गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या मेंदूला दुखापत झाल्याने ते कोमातच होते. झवेरी बाजार, कबुतरखाना आणि ऑपेरा हाऊस येथे झालेल्या साखळी स्फोटात जखमींवर जे.जे.हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आज सकाळी हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणार्‍या चंद्रकांत शंकर यांचा मृत्यू झाला.

close