अधिवेशवनात कामकाज सुरळीत होऊ द्यावे – पंतप्रधान

July 31, 2011 11:56 AM0 commentsViews: 2

31 जुलै

उद्यापासून सुरू होणार्‍या पावसाळी अधिवेशनात संसदेचे कामकाज सुरळीत होऊ द्यावे असं आवाहन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सर्व पक्षांना केले. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांनी आज एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला सत्ताधारी आणि विरोधक या सगळ्यांनी हजेरी लावली होती. या अधिवेशनात विरोधक सत्ताधार्‍यांना अनेक मुद्यांवरून घेरण्याची शक्यता आहे. यात भ्रष्टाचार आणि महागाई या महत्त्वाच्या मुद्यांचा समावेश आहे.

close