अंधांना डोळस भेट – बालपत्रकार स्वानंदी केळकर

November 14, 2008 2:10 PM0 commentsViews: 3

13 नोव्हेंबर, पुणेस्वानंदी केळकरपुण्यातल्या अक्षरनंदन या शाळेत एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. या शाळेतल्या सहावीतल्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमैत्रिणीच्या आईकडून ब्रेल लिपीचे धडे गिरवले. पण एवढ्यावरच समाधान न मानता या मुलांनी ब्रेल लिपीत कवितांचं पुस्तकंही बनवलं. हे कवितांचं पुस्तक ते आता अंध शाळेतील विद्यार्थ्यांना भेट देणार आहेत. या उपक्रमाविषयी बोलताना ' इश्वराने आम्हाला दोन डोळे दिलेत, त्याचा आनंद तर आहेच. पण या उपक्रमामुळे आम्हाला डोळ्याची किंमत कळली. ' अशी प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी दिली. आजच्या धावपळीच्या जगात माणुसकी नष्ट होत चालल्याची ओरड सगळेच करतात. पण आपल्या कृतीतून माणुसकी जपण्याचा प्रयत्न करणारी ही मुलं जगाला नवा आदर्श देत आहेत. या अनोख्या उपक्रमाविषयी आमची बालपत्रकारस्वानंदी केळकरचा स्पेशल रिपोर्ट तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर पाहू शकता.

close