भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाईसाठी सरकारची योजना ?

July 30, 2011 5:07 PM0 commentsViews: 4

30 जुलै

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ऍक्शन प्लॅन तयार केला आहे.त्याचा तपशील आयबीएन – नेटवर्कच्या हाती लागला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच्या मंत्रिगटाने सरकारला भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाईबाबत काही शिफारसी केल्यात. त्यात भ्रष्ट अधिकार्‍यांविरुद्ध 3 महिन्यांच्या आत कारवाई व्हावी भ्रष्टाचाराचे खटले चालवण्यासाठी किमान 71 सीबीआय कोर्ट्सची स्थापना करावी अशी सूचना केली. सध्या असे फक्त 10 कोर्ट्स सुरू आहेत. 10 वर्षांपूर्वीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा तपास नव्याने सुरू करावा केंद्रीय मंत्र्यांचे वैयक्तिक विशेषाधिकार काढून घ्यावेत आणि सार्वजनिक साहित्याची खरेदी आणि कॉन्ट्रॅक्ट्समध्ये पारदर्शकता आणावी, असंही मंत्रिगटाने सुचवले आहेत.

close