लक्ष्मणच्या बॅटवर इंग्लंडचा माजी कर्णधाराचा आक्षेप

July 31, 2011 1:04 PM0 commentsViews: 3

31 जुलै

भारत-इंग्लंड टेस्ट मॅच रंगतदार अवस्थेत असताना या मॅचला वादाचं गालबोट लागलयं. या मॅचदरम्यान भारताचा बॅट्समन व्ही.व्ही.एस लक्ष्मणने हॉट स्पॉट तंत्रज्ञानाला मॅनिप्युलेट केलाचा आरोप इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकेल वॉननं केला.

लक्ष्मणने बॅटला व्हॅसलिन लावून डीआरएसमधील हॉटस्पॉट तंत्रज्ञानाला चकवण्याचा प्रयत्न केला असल्याचे वॉनने म्हटलं आहे. बॅटला लावलेल्या व्हॅसलिनने लक्ष्मणला वाचवलं का ? असं वॉननं टिवट्‌र वर विधान केलं.

लक्ष्मण 27 रन्सवर खेळत असताना बॅटचा एज लागल्याची अपील करण्यात आलं होतं. पण हॉट स्पॉटमध्ये एज लागल्याचे दाखवण्यात हे तंत्रज्ञान अपयशी ठरलं. त्यामुळे तिसर्‍या अंपायरने हे अपील फेटाळलं होतं.

मात्र बॅटला कोणतेही द्रव्य लावल्याचा पुरावा नसल्याचे इंग्लंडचा बॉलर स्टुअर्ट ब्रॉडने मीडियाशी बोलताना सांगितले. तसेच बॅटचे छोटे एज दाखवण्यात हॉट स्पॉट तंत्रज्ञान अपयशी ठरलं असल्याचे तो म्हणाला.

close