अनधिकृत बांधकामामुळे ठाण्यात पाण्याचे तळे

July 31, 2011 8:53 AM0 commentsViews: 2

31 जुलै

ठाणे जिल्ह्यातील मीरागाव येथील कृष्णस्थळ आणि अमिष पार्क या संकुलातील 19 इमारतींना पावसाळ्यात एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिसरात थोडा जरी पाऊस पडला तरी या परिसरात पाणी जमा होतं. त्यामुळे येथील मुलांना शाळेत जाता येत नाही किंवा रहिवाशांना कामावर जाता येत नाही.

या संकुलात जवळपास चारशे कुटूंब राहतात. आजुबाजूच्या परिसरात बिल्डर लॉबीने पालिका अधिकार्‍यांना हाताशी धरुन अनधिकृत बांधकाम केलं असल्याचं रहिवाश्यांचे म्हणणे आहेत. यामुळे नाले अरुंद होऊन पाणी जायला वाटच नाही. या संदर्भात मीराभाईंदर महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता या प्रकरणी त्यांनी बोलण्यास नकार दिला.

आजुबाजूच्या परिसरात नविन इमारतींचे बांधकाम झाले. तर काही बिर्ल्ड्सनी स्थानिक पालिकेला हाताशी धरुन अनाधिकृत बांधकाम केले. ज्यामुळे नाले अरुंद केले त्यामुळेच येथील रहिवाशांना हा त्रास होत आहे.

या समस्या संदर्भात मीराभाईंदर महानगरपालिकेला अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता या प्रकरणी त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. तर स्थानिक काँग्रेसचे नगर सेवक सालेम शेरब शहराच्या बाहेर असल्याचे आढळले. यामुळे स्थानिक रहिवाशांना या समस्येसाठी स्वतः झगडावे लागत आहेत.

close