जुहू किनार्‍यावर पुन्हा एक जहाज अडकलं

July 31, 2011 9:44 AM0 commentsViews: 3

31 जुलै

जुहू जवळच्या वर्सोवा समुद्रकिनार्‍यावर आणखी एक जहाज अडकलं आहेत. एम व्ही पवित असं या तेलवाहू जहाजाचे नाव आहे. या जहाजाचे वजन 1 हजार टन असून 1990 साली बांधण्यात आलेल्या या जहाजाची याच महिन्यात दुरूस्ती करण्यात आली होती.

एम व्ही पवित हे जहाज नेमक कसं अडकलं याची तपासणी करण्यासाठी कोस्टगार्डची टीम अमृतकौर या जहाजातून पवितवर पोहोचली आहे. तर एम व्ही पवितला किनार्‍यापासून दूर करण्यासाठी टोईंग बार्जही काही वेळातच तिथे दाखल होईल. काही दिवसांपूर्वी याच समुद्रकिनार्‍यावर एम व्ही विस्डम हे जहाज असंच किनार्‍याजवळच्या वाळूत फसलं होतं.

close