सोलापुरात नारळ हंडी साजरी

July 31, 2011 3:02 PM0 commentsViews: 9

31 जुलै

मुंबईत आता गोविंदा पथकांना दहीहंडीचे वेध लागले आहेत. पण सोलापुरात मात्र एक आगळीवेगळी दहीहंडी साजरी केली जातं आहे. सोलापुरातल्या अरण गावात ही अनोखी नारळ हंडी साजरी केली जाते. आषाढी एकादशीनिमित्त सगळ्या पालख्या पंढरपुरात येतात.

पण संत सावतामाळी यांची भेट घेण्यासाठी खुद्द विठ्ठलच अरण गावात येतो अशी इथल्या गावकर्‍यांची श्रद्धा आहे. त्यामुळे पांडुरंगाची पालखी जेव्हा अरणमध्ये येते तेव्हा हा असा नारळ हंडीचा सोहळा रंगतो.

एका मोठ्या दोरीला उंचावर शेकडो नारळ बांधले जातात आणि मग ती दोरी हलवली जाते. यावेळी पडणारे नारळ घेण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ लागते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकसुद्धा इथे जमतात.

close