दडपशाही केली तर स्वत:ला अटक करून घेऊ – अण्णा हजारे

July 31, 2011 5:00 PM0 commentsViews: 1

31 जुलै

16 ऑगस्टचे आंदोलन थांबवण्यासाठी सरकारने जर दडपशाही केली तर स्वत:ला अटक करून घेऊ असा इशारा अण्णा हजारे यांनी सरकारला दिला. लोकशाही मार्गाने हे लोकपालासाठीचं आंदोलन आहे. त्यात दबावतंत्र वापरून सरकार हस्तक्षेप करत असेल, तर ते संविधानाचं उल्लंघनच आहे असंही अण्णांनी म्हटले आहे. दिल्ली पोलीस आणि प्रशासनाने कडक भूमिका घेतली असली, तरी अण्णा हजारे जंतर मंतरवरच्या 16 ऑगस्टच्या त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत. सरकारने हे आंदोलन दडपण्याची चूक करू नये असा इशाराही त्यांनी दिला.

close