यु. म.पठाण यांना डॉ. व. दि. कुलकर्णी स्मरणार्थ गौरव पुरस्कार

July 31, 2011 3:31 PM0 commentsViews: 34

31 जुलै

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. यु. म.पठाण यांना 'डॉ. व. दि. कुलकर्णी स्मरणार्थ गौरव पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. डॉ. कुलकर्णी हे मुंबई विद्यापीठात मराठी विभागप्रमुख होते. साहित्य क्षेत्रात भरिव कामगिरी करणार्‍या दोन साहित्यिकांना डॉ. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी हा गौरव पुरस्कार देण्यात येतो.

यंदा डॉ. यु. म. पठाण आणि स. दा. कर्‍हाडे यांना हा पुरस्कार देण्यात आला. डॉ. कुलकर्णी यांच्या कन्या कविता निरगुडकर यांच्या उपस्थितीत डॉ. यू म पठाण यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्यिकांच्या घरी जाऊन पुरस्कार प्रदान करण्याची या पुरस्काराची परंपरा आहे.

close