रिक्षामध्ये गिचमीड – बालपत्रकार समिधा जोशी

November 14, 2008 2:34 PM0 commentsViews: 3

13 नोव्हेंबर, नागपूरसमिधा जोशीशाळेत जाण्यासाठी बर्‍याच ठिकाणी ऑटोरिक्षाचा वापर केला जातो. पण या रिक्षांमध्ये मुलांची काय अवस्था असते, याचा आढावा घेतला आमची नागपूरची बालपत्रकार समिधा जोशीने.नागपूरची साउथ पॉइन्ट शाळेतली 75 टक्के मुलं ऑटोरिक्षानचं ये- जा करतात. शाळा दूर असल्यानं ती सायकलनीही येउ शकत नाहीत. शिवाय आई-वडील दोघांनाही नोकरीमुळे मुलांना शाळेत सोडायला वेळ नाही. म्हणून ते मुलांना ऑटोने पाठवतात. आणि पूर्ण जबाबदारी ऑटो ड्रायव्हर वर टाकतात. पण ती जबाबदारी ऑटोरिक्षा ड्रायव्हर पूर्णपणे पार करतात का? हे कोणीच पाहात नाही.तीन माणसांची क्षमता असणार्‍या रिक्षात दहा-दहा मुलांना कोंबले जातं. ऑटोमध्ये ही सगळी मुलं गिचमीड करून बसवतात. त्यातच रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे हा प्रवास जास्तंच धोकादायक बनतो. या सगळ्या प्रकारा मुळं अपघात होउ शकतो हे त्यांना कळत नाही.पण यांची जबाबदारी ज्या ड्रायव्हर्सवर असते ते फक्त पैसे कमवण्यासाठी हा प्रकार करतात. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. हे सगळं कुठेतरी थांबंलं पाहीजे असं वाटतं.

close