बाप्पा निघाले मॉरिशसला

July 31, 2011 10:24 AM0 commentsViews: 5

गणेश गायकवाड, बदलापूर

31 जुलै

गणेशोत्सवाला आता अवघा एक महिनाच उरला आहे. त्यामुळे गणेशमूतीर्ंच्या रंगकामाला वेग आला. पण बदलापूरमधील गणपती कला केंद्रात वेगळीच लगबग सुरू आहे. येथील गणपती निघालेत मॉरिशसला.

सगळीकडेच आता गणपतीबाप्पांच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहेत1. बदलापूरच्या आबवणेंच्या कलाकेंद्रातल्या मूर्तीकारांना तर जराही उसंत नाही. कारण इथले बाप्पा निघालेत मॉरिशसला.

मॉरिशसच्या सनातन धर्म टेम्पल फेडरेशनने या कलाकेंद्रात 400 गणेशमूर्त्यांची ऑर्डर नोंदवली. त्यामुळेच काही मूर्त्या त्यांना महिनाभर आधीच तयार कराव्या लागत आहे. आणि विशेष म्हणजे ऑर्डरच्या या सगळ्या गणेशमूर्त्या बनवल्यात प्रदीप आणि प्रणय या दोन मूकबधीर युवकांनी.

या परदेशवारीसाठी मूर्त्यांच्या पॅकिंगच्या कामाला आता वेग आला. या मूर्त्यांचं पॅकिंग विशेष पद्धतीनं करण्यात येतं. परदेशवारीसाठी जाणारे गणपती तयार झाल्यावर आता इथल्या कारागिरांना वेध लागलेत ते स्थानिक ऑर्डर पूर्ण करण्याचे.

close