पुण्यात ‘लोकमत वुमन समीट’ थाटात संपन्न

July 31, 2011 4:50 PM0 commentsViews: 6

31 जुलै

वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्ववान स्त्रिया आज पुण्यात एकत्र आल्या होत्या निमित्त होतं लोकमततर्फे आयोजित वुमन समेटचं .आज सकाळी लोकमत मीडिया लिमिटेडचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा यांनी या समीटचं उद्घाटन केलं. किरण बेदी, वर्षा गायकवाड आणि बिर्ला फाऊंडेशनच्या राजश्री बिर्ला यांच्या उपस्थितीत या समेटला सुरवात झाली.

महिला सन्मान हे ब्रिदवाक्य घेऊन'लोकमत' तर्फे पुण्यात हॉटेल वेस्टन येथे 'लोकमत वुमेन समीट' चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांच्या विविध प्रश्नावर परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले होते. यात 'महिला सक्षमीकरण: प्रचलित शिक्षण पध्दती आणि भारतीय मुली' आणि 'जागतिकीकरणाचा महिला सबलीकरणावरील परिणाम आणि 'स्त्रियांचा घटता जननदर- स्त्रि-पुरुष प्रमाणातील असंतुलन'या विषयांवर संवाद साधण्यात आला.

close