2 जी प्रश्नी विरोधकांचा गोंधळ ; कामकाज उद्यापर्यंत तहकूब

August 1, 2011 8:28 AM0 commentsViews: 1

01 ऑगस्ट

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. हे अधिवेशन वादळी ठरणार अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार सुरूवातीलाच विरोधकांनी आक्रमक पवित्र्यात होते. पंतप्रधानांनी नविन मंत्र्यांची ओळख करून दिली. लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास रद्द करून 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली.

त्यावरून त्यांनी गोंधळाला सुरूवात केली. मात्र लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांनी ही मागणी फेटाळली. त्यानंतर लोकसभेचे दिवगंत सदस्य भजनलाल यांना श्रद्धांजली वाहून लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं. तर राज्यसभेतही विरोधकांनी आक्रमकपणे 2 जी वर चर्चेची मागणी केली.

राज्यसभेतल्या नविन खासदारांनी आज शपथ घेतली. जमीन अधिग्रहण कायद्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. त्याबरोबरच राज्यसभेतही प्रश्नोत्तराचा तास रद्द करून महागाई आणि 2 जी घोटाळ्यावर चर्चा घ्यावी ही विरोधकांची मागणी अध्यक्षांनी फेटाळली. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.

close