रायगडला पावसाने झोडपले

August 1, 2011 10:12 AM0 commentsViews: 3

01 ऑगस्ट

रायगड जिल्ह्यात सलग तीन दिवस पावसाचा जोर कायम आहे. गेल्या चोवीस तासांत 106 मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हसळा, श्रीवर्धन, महाड, तळा, पोलादपूर आणि माणगाव या गावात पावसाचा चांगलाच तडाखा बसला. आतापर्यंत म्हसळा इथं गेल्या चोवीस तासात सर्वाधिक म्हणजे 174 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील सावित्री, गांंधारी, काळ नदी दुथडी भरुन वाहत आहे. येत्या 12 तासात कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहिल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली.

close