बारवी धरण तुडूंब

August 1, 2011 10:48 AM0 commentsViews: 67

01 ऑगस्ट

नवी मुंबईसह ठाणे, मीरा- भाईंदर आणि कल्याण डोंबिवली परिसराला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण पूर्णपणे भरुन वाहण्याच्या मार्गावर आहे. सध्या धरण 96.35 टक्के भरलेल आहे. धरणाच्या पाणी पातळीवरुन काही दिवसापूर्वी एमआयडीसी अधिकार्‍यांमध्ये चितेंच वातावरण होतं ते आनंदात बदललं. पाऊस असाच सुरु राहिला तर आणखी एका दिवसात धरण 100 % भरुन वाहू लागेल असं सांगण्यात येत आहे. 170 दशलक्ष घनमीटर एवढी बारवी डॅमची क्षमता आहे. गेल्या वर्षी 28 जुलै महिन्यातचं धरण भरलं होतं.

close