शिवसेनेचे नगरसेवक सुरेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल

August 1, 2011 11:33 AM0 commentsViews: 8

01 ऑगस्ट

शिवसेनेचे भांडूपचे नगरसेवक सुरेश शिंदे यांच्यावर भांडुप पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जमिनीचा गैरव्यवहार करणे, बनावट कागदपत्रं बनवणे आणि जमीन बळकावणे या प्रकरणी शिंदे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. भांडुपमधील एका मंदिराचे महंत राममिलन दास यांची 1989 मध्ये हत्या झाली. त्यानंतर 1992 साली मृत राममिलन दास यांनी जमीन सुरेश शिंदे यांना विकल्याचे बनावट कागदपत्रं सुरेश शिंदे यांनी बनवले. मृत व्यक्तिच्या नावावर जमिनीचे रजिस्ट्रेशन करण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाली. सुरेश शिंदे यांच्यावर याआधीही 9 गुन्हे दाखल आहेत.

close