बनावट शाळेच्या वादात 700 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

August 1, 2011 12:08 PM0 commentsViews:

01 ऑगस्ट

सीबीएससी बोर्डाची जाहिरात करून पालकांना फसवणार्‍या नाशिकच्या ब्युकलीन बर्डीज शाळेला कोणताही मान्यता नसल्याचे शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केलं. या शाळेची पूर्ण चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश त्यांनी शिक्षणाधिकार्‍यांना दिला. दरम्यान, फसवणूक झालेल्या पालकांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. त्याशिवाय अटकपूर्व जामीन घेणार्‍या शाळेच्या संचालकांचा जामिनालाही नाशिक कोर्टात आव्हान देण्यात आलं. शाळेच्या या वादात 700 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागले आहे.

close