2 जी बद्दल पंतप्रधान, प्रणव मुखर्जींना माहिती होती – बलवा

August 1, 2011 1:19 PM0 commentsViews: 4

01 ऑगस्ट

2 जी घोटाळ्याप्रकरणी डी. बी. रिऍल्टीचे प्रमोटर शाहीद बलवा यांची आज स्पेशल सीबीआय कोर्टात साक्ष झाली. बलवा यांनी या वादात आता त्यावेळचे परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी आणि तेव्हाचे सॉलिसिटर जनरल वहानटी यांना खेचले. टेलिकॉमच्या धोरणाबद्दल या दोघांना पूर्ण माहिती होती असं बलवा यांनी म्हटले.

शिवाय पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही 2 जी च्या व्यवहाराचा सर्व तपशील माहित होता. आणि सर्व निर्णयांना त्यांनी मान्यता दिली होती असा आरोपही बलवा यांनी केला. कॅगच्या अहवालात अतिशयोक्ती आहे. 2 जी घोटाळ्याची आकडेवारी कॅगने फुगवून दाखवल्याचा आरोप बलवा यांनी केला. बलवा यांनी सीबीआयवरही तोफ डागली.

सीबीआयनं तपास काही विशिष्ट लोकांवर केंद्रीत केलं आणि निरपराध व्यक्तींना अटक केली असंही ते म्हणाले. 2 जी घोटाळ्यात झालेल्या नुकसानीप्रकरणी सीबीआयने अर्थ किंवा दूरसंचार मंत्रालयाला एकही पत्र का पाठवलं नाही असा प्रश्न त्यांनी विचारला. फसवणूक, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कटाचा आरोप ठेवून बलवा यांना 8 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती.

close