जंतरमंतरवर परवानगी नाकारली ; 5 जागांचे पर्याय

August 2, 2011 9:17 AM0 commentsViews: 7

02 ऑगस्ट

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या जंतरमंतरवरील उपोषणाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली. पण अण्णा हजारे यांनी दिल्लीतील पाच जागांचे पर्याय पोलिसांना दिले आहेत. अण्णांना रामलिला मैदान, शहीद पार्क, आणि राज घाट येथे आंदोलन करण्यासाठी पर्यायी जागा सुचवली आहे.

नागरी समितीची आज दिल्लीत शांती भूषण यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच अण्णा हजारे सर्वपक्षीय खासदारांना पत्र लिहून सरकारच्या लोकपाल विधेयकाला पाठिंबा देऊ नका असं आवाहन करणार आहेत.

मंत्रिमंडळात जन लोकपालचा मसुदा मंजूर करण्यात आला. सरकारच्या या निर्णयाला विरोध करत अण्णा हजारे यांनी आपलं आंदोलन अधिक तीव्र केलं. सरकारने जनतेची थट्टा केली असा आरोप अण्णांनी केला. सरकारने जर जंतर मंतरवरचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तर स्वत:ला अटक करवून घेण्याचा इशाराही अण्णा हजारेंनी केंद्र सरकारला दिला.

तसेच जनलोकपालासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शन च्यावतीने जनमत चाचणी घेण्यात आली. या चाचणीत बहुतांश जणांनी नागरी समितीच्या मसुद्याला पाठिंबा व्यक्त केला. पंतप्रधानांनाही लोकपालाच्या कक्षेत आणावे असं मतही 85 % लोकांनी व्यक्त केलं.मात्र अण्णांच्या आंदोलनाला जंतर मंतरवर परवानगी न देण्याचा निर्णयावर ठाम राहत दिल्ली पोलिसांनी आज अखेर शिक्कामोर्तब केलं. पण अण्णांना रामलिला मैदान, शहीद पार्क, आणि राज घाट येथे आंदोलन करण्यासाठी पर्यायी जागा सुचवली.

close