कॅगचा पंतप्रधान कार्यालयावर ठपका

August 1, 2011 3:57 PM0 commentsViews: 2

01 ऑगस्ट

कॉमनवेल्थ घोटाळ्याबाबत कॅगचा अहवाल उद्या संसदेत सादर करण्यात येणार आहे. त्यात पंतप्रधान कार्यालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. या अहवालाचा तपशील आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागली आहे. या अहवालात सुरेश कलमाडी यांची कॉमनवेल्थ च्या प्रमुखपदी नेमणूक केल्याबद्दल पंतप्रधान कार्यालयाला दोषी ठरवण्यात आलं आहे.

मणिशंकर अय्यर आणि सुनील दत्त यांनी कलमाडींविरुद्ध केलेल्या तक्रारीला पंतप्रधान कार्यालयाने दुर्लक्ष केले आहेत. या सर्व घोटाळ्यात कलमाडींनी जाणीवपूर्वक काम करण्यात दिरंगाई करून खर्चात वाढ केली असा ठपकाही ठेवण्यात आला आहे. त्याच बरोबर दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीही वाढत्या खर्चाविरोधात पावलं उचलली नाहीत. तसेच दिल्ली सरकारच्या संस्थांनी शहराच्या सुशोभीकरणासाठी गरजेपेक्षा जास्त खर्च केला आहेत. अशी माहिती आयबीएन लोकमतच्या सुत्रांनी दिली .

close