मुकेश अंबानींचा बंगला वादाच्या भोवर्‍यात

August 1, 2011 4:59 PM0 commentsViews: 2

01 ऑगस्ट

रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी त्यांच्या मंुबईतील एंटालीया या आलिशान घरामुळे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्या या घराच्या विक्री व्यवहाराची सीबीआय चौकशी होण्याचे संकेत विधानसभेतून आले आहे. दक्षिण मंुबईतील वक्फ बोर्डाची जमीन मुकेश अंबानी यांनी विकत घेऊन त्यावर एंटालीया हे आलिशान घर बांधले होते.

विधानसभेत लेखी उत्तरात सरकारने ही माहिती दिली. मुकेश अंबानी यांनी वक्फ बोर्डाची जमीन करीमभाई इब्राहिमभाई खोजा आफेनेजया यांनी धर्मदाय संस्थेकडून विकत घेतली होती. वक्फ बोर्डाची ही जमीन असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारला या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिलेत होते. त्याचबरोब या प्रकरणी सीबीआयकडे चौकशीसाठी सोपवण्यात बाबत न्याय आणि विधी विभागाने आपल्या सल्ल्यासह हे प्रकरण गृह विभागाकडे गेल्या आठवड्यात अभिप्रायासाठी पाठवलं होतं.

close