कोल्हापुरात पंचगंगा साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ

August 2, 2011 10:01 AM0 commentsViews: 6

02 ऑगस्ट

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे सत्ताधार्‍यांना सभा अवघ्या दहा मिनीटात आटोपती घ्यावी लागली. सोमवारी कारखाना स्थळावर ही वार्षिक सभा घेण्यात आली होती. सभेच्या सुरवातीपासून सत्तारुढ आणि विरोधी गटात वाद निर्माण झाला.

गोंधळातच कारखाना भाडेतत्वावर देण्याचा विषय मंजूर झाल्याची घोषणा कारखान्याच्या अध्यक्ष पी.एम.पाटील यांनी केली. त्यातून सत्ताधारी आणि विरोधकात मोठी वादावादी झाली. यावेळी विरोधी गटाच्या रजनीताई मगदुम यांनी स्टेजकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला.

पण त्यांना सत्ताधार्‍यांनी अडवलं. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटात धक्काबुक्की झाली. काहींनी स्टेजच्या दिशेनं चप्पला भिरकावल्या. त्यामुळे सभास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना आवरले.

close