‘बिग बॉस’च्या घरात माईक टायसन येणार ?

August 2, 2011 11:30 AM0 commentsViews: 4

02 ऑगस्ट

बिग बॉस 4 मध्ये पॅमेला अँडरसन आणि खली यांना आणल्यामुळे आता सिझन 5 मध्ये कोणकोणते स्टार्स येतील याची उत्सुकता वाढली आहे. आज पर्यंत झालेल्या बिग बॉसमध्ये वादग्रस्त व्यक्ती, चोर, दरोडेखोर यांनी हजेरी लावली आहे.यंदाच्या सिझन 5 साठी आता चर्चा सुरू आहे माइक टायसनची. वादाच्या भोवर्‍यात अडकलेला बॉक्सिंग चॅम्पियन माईक टायसन यावेळी बिग बॉसच्या घरात एंट्री घेण्याची शक्यता आहे. हा 45 वर्षीय बॉक्सिंग चॅम्पियन बिग बॉसच्या घरात कामं करताना दिसणार आहे. तेव्हा घरातल्या बाकीच्या सेलिब्रिटीजनी आपआपले कान सांभाळायला हवेत. बिग बॉसचा नवा सिझन ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे.

close