मुलांना ओझं दप्तराचं – बालपत्रकार सृष्टी दाश्येटे

November 14, 2008 2:50 PM0 commentsViews: 4

14 नोव्हेंबर, मुंबईसृष्टी दाश्येटे दररोज मुलांना शाळेत घेऊन जावी लागणारी गोष्ट म्हणजे दप्तरं. आणि दिवसेंदिवस मुलांचं दप्तर अधिकाधिक जड होत चाललं आहे. मुलांच्या नेमक्या याच प्रश्नाला वाचा फोडली आमची बालपत्रकार सृष्टी दाश्येटेनी.पाचवीत शिकणार्‍या सदाशिव वैद्यला विचारलं की त्याची बॅग जड का असते, तेव्हा त्याचं उत्तर होतं, ' मला खुप पुस्तकं आणावी लागतात आणि नाही आणलं तर बाई मारतात. ' यानंतर सृष्टीनं जरा मोठ्या म्हणजे नववीतल्या मुलांना विचारलं की या ओझ्याचा त्यांना काय त्रास होतो ? यावर उत्तर मिळालं ' जड दप्तरांमुळे पाठदुखीचा त्रास होतो शिवाय जर बिल्डींग चढुन जायचं असेल तर आणखी वैताग ! 'पण या प्रश्नाचं उत्तरही लहान मुलांकडे आहे. ' रोज वह्या चेक करण्यापेक्षा शिक्षकांनी आठवड्यातला एक दिवस असा ठेवावा ज्या दिवशी सगळ्यांच्या वह्या चेक करता येतील. ' लहान मुलांनीच सुचवलेला आणखी एक उपाय म्हणजे 'याशिवाय मला असं वाटतं की एका बाकावरच्या दोन मुलांनी अर्धी अर्धी पुस्तकं आणावीत म्हणजे दोघांचं ओझं कमी होईल. ' पण शिक्षकांच्या मते ' तासाला पुस्तक असलंच पाहिजे. 'दप्तरांचं ओझं तर होतंय आणि त्यावर मुलांनी सुचवलेले उपाय शिक्षकांना मान्य नाहीत. पण मग दप्तराचं ओझं कसं कमी होणार या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच माही.

close