वाशिममध्ये 24 बोगस नसबंदी

August 2, 2011 8:14 AM0 commentsViews: 2

02 ऑगस्ट

वाशिम जिल्ह्यातील आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बोगस नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचा प्रकार घडला.येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी तब्बल 24 बोगस नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचे उघड झाले. नांदगाव इथं राहणारे रामेश्वर ठाकरे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती मागितली. तेव्हा ही बाब उघड झाली.

यादीत लिहिलेल्या नावांची व्यक्ती गावातच नसल्याचा पुरावाही त्यांनी ग्रामपंचायतीतून दिला. दरम्यान, या आरोग्य केंद्रात अशा कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या नसल्याचा दावा येथील डॉक्टरांनी केला. मात्र ह्या प्रकरणात सरकारची दिशाभूल केल्याचा आरोप गावकरी करत आहे.

close