ठाण्यात तरुणीचा मृतदेह आढळला

August 2, 2011 12:23 PM0 commentsViews: 4

02 ऑगस्ट

ठाण्याच्या वागळे इस्टेटच्या आगारासमोर सकाळी सातच्या सुमारास एका 17 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. परिसरात असलेल्या एका बाकावर हा मृतदेह आढळला. ठाण्याच्या साठेनगर परिसरात राहणारी आरती ठाकूर हीचा हा मृतदेह असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. आरती गेल्या 5 महिन्यांपासून बेपत्ता होती. तिच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली होती. ठाण्याच्या श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्या मृत्यूविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

close