सचिनच्या पुढाकाराने ‘इंडियन रेसिंग लीग’

August 2, 2011 1:32 PM0 commentsViews: 4

02 ऑगस्ट

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेट इतक्याच रेसिंग कार चालवायलाही आवडतात हे सगळ्यांना माहीत आहे. पण सचिनची ही आवड त्याच्यासाठी आता प्रोफेशन बनणार आहे. आयपीएलच्या धर्तीवर इंडियन रेसिंग लीग सुरु करण्यासाठी मचधर व्हेंचर्स ही कंपनी प्रयत्नशील आहे.

आणि रेसिंग लीगच्या प्रोजेक्टमध्ये सचिन 26 टक्के भागीदार असल्याची चर्चा आहे. रेसिंग लीग सुरु करण्याची तयारीही अंतिम टप्प्यात आहे. भारत, पश्चिम आशिया आणि पूर्वेकडच्या देशात ही लीग भरवण्यात येईल. आणि लीगमध्ये आठ टीमचा सहभाग असेल.

फॉर्म्युला वन प्रमाणेच प्रत्येक टीमचे दोन ड्रायव्हर असतील. अर्थात या लीगमध्ये सचिनचा सहभाग कशा स्वरुपात असेल प्रमोशन खेरीज तो कशा कशात भाग घेईल हे अजून समजलेले नाही.

close