मुंबईत डान्स बार सुरूच !

August 2, 2011 2:32 PM0 commentsViews: 6

02 ऑगस्टडान्स बारला बंदी असतानाही मुंबईत काही ठिकाणी पडद्याआड राजरोसपणे सुरूच आहे अशा डान्सबारच्या चित्रिकरणाची सीडी आमदार देवेंद्र फडणवीस यांनी सादर केली. त्यावर चोवीस तासाच्या आत चौकशी करुन दोषी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन आर आर पाटील यांनी दिले.

दरम्यान, राज्यात अनेक वर्तमानपत्रामधून आणि वेबसाईटवरुन फ्रेंडशिप क्लब आणि मसाज पार्लरच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय सुरु असल्यासंदर्भातला प्रश्न विधानपरिषद सदस्य हुसैन दलवाई आणि दीप्ती चौधरी यांनी उपस्थित केला.

यावर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अशा जाहिरातींच्या माध्यमातून असे गैरप्रकार करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील पोलीस आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रांतील वर्तमानपत्रांच्या संपादकांशी बैठका घेऊन अशा जाहिराती न छापण्याचे आवाहन करावे असे आदेश दिले असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

close