उल्हासनगर आत्महदन प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल

August 3, 2011 12:04 PM0 commentsViews: 3

03 ऑगस्ट

उल्हासनगरमध्ये मंगळवारी महानगरपालिकेसमोर प्रशांत लहाणे या तरुणाने आत्मदहन केल्यानंतर उल्हासनगरमध्ये चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. यावरुन महापालिका आणि शिक्षण मंडळामध्ये पोलिसांच्या विरोधात प्रतिक्रिया उमटत आहे.

याप्रकरणी महापालिकेतल्या 2 हजार 600 कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. शिक्षण मंडळातल्या 30 शाळांमधील 300 शिक्षकांनी आज पोलीस आयुक्त कार्यालयावर मूक मोर्चा काढला.

यामध्ये शिक्षिका शुभांगी साळंुखे हिचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही. त्यांना विनाकारण या प्रकरणात गोवण्यात आले. आणि तिच्यावर दाखल केलेले गुन्हे काढून टाकावेत अशी मागणी केली.

close