वीरेंद्र सेहवाग आला परत

August 2, 2011 5:24 PM0 commentsViews: 27

02 ऑगस्ट

इंग्लडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 0-2 अशा पिछाडीवर पडलेल्या भारतीय टीमला सहारा देण्यासाठी धडाकेबाज ओपनर वीरेंद्र सेहवाग तिसर्‍या टेस्टपूर्वी टीममध्ये परतणार आहे. येत्या दोन दिवसातच सेहवाग टीममध्ये दाखल होईल. आणि पुढच्या प्रॅक्टिस मॅचमध्ये तो खेळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात होणार्‍या बर्मिंगहॅम टेस्टमध्ये सेहवाग आणि गंभीर ही नेहमीची ओपनिंग जोडी खेळेल हे नक्की. कारण गंभीरही आता खांद्याच्या दुखापतीतून सावरला आहे.

close