भैया ‘ नव्हे तर मेरे भैया

November 14, 2008 3:00 PM0 commentsViews: 2

14 नोव्हेंबर, मुंबईराज ठाकरे पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्ह आहेत. यावेळी राज ठाकरेंनी केक कापण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. या केकवर ' भैया ' लिहण्यात आलं होतं. राज ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्यावेळी हा केक कापलाय. मध्यप्रदेशमधील समाजवादी पार्टीचे आमदार किशोर समरिते यांनी हा व्हिडिओ रिलीज केला आहे. या व्हिडिओवरुन मोठा वाद निर्माण होईल, असं वाटत नसल्याची प्रतिक्रिया मनसेच्या विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली. ' राज ठाकरेंनी फक्त केक कापलाय. तो त्यांना एका पक्षाच्या महिला सदस्यानं बहिणीच्या नात्यानं दिला होता. त्यामुळे 'भैया ' नावाच्या केकवरुन हा वाद निर्माण होईल, असं वाटत नाही ', असं देशपांडे यांनी सांगितलं. दरम्यान, मनसेच्या श्‍वेता परुळेकर यांनी केकवर ' मेरे भैया ' असं लिहिलं होतं. त्यात वाद करण्याखं काहीच नाही, असं म्हटलंय.

close