कोल्हापुरात पावसाचा जोर कायम

August 3, 2011 12:37 PM0 commentsViews: 1

03 ऑगस्ट

कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 445 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 144 मि.मी.इतका झाला आहेत. जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरण 100 टक्के भरलं असून धरणाचे तीन स्वयंचलीत दरवाजे उघडले आहेत. त्यातून 6000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर काळम्मावाडी धरण 85 टक्के भरलं असून त्यातून 1800 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

close