अधिकार्‍यांच्या बदल्यासाठी मनसेचे आंदोलन

August 3, 2011 12:42 PM0 commentsViews: 1

03 ऑगस्ट

कोल्हापूर परिवहन विभागीय कार्यालयातील अधिकार्‍यांच्या बदल्या तत्काळ कराव्यात या मागणीसाठी आज मनसेनं आंदोलन केलं. कोल्हापूर परिवहन विभागात अनेक कर्मचारी आणि अधिकारी गेल्या 15 वर्षापासून सेवेत आहेत. या अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियमाप्रमाणे बदल्या होणे आवश्यक असतानाही बदल्या करण्यात आलेल्या नाहीत.

त्यामुळे आज मनसेनं हे आंदोलन केलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडून परिवहन विभागाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवून अटक केली. परिवहन विभागाने तत्काळ 15-15 वर्षे एकाच ठिकाणी काम करणार्‍या अधिकारांच्या बदल्या केल्या नाहीत तर कार्यालयाला टाळं ठोकू असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला.

close